Satata Dist News : पाचगणीतील ‘द फर्न’ हॉटेल प्रशासनाकडून सील, नगरपालिकेची धडक कारवाई…

भिलार – पाचगणीतील तायघाटच्या बाजूला महाबळेश्वर-पाचगणी या रस्त्यावर असलेले द फर्न हॉटेल अनाधिकृत बांधकाम म्हणून नगरपालिकेने अगोदरच घोषित केले होते. ते सील करण्याची कारवाई प्रशासनाने शुक्रवारी केले.
याबाबत अधिक माहिती अशी, द फर्न हॉटेल हे रहिवाशी वापरासाठी असावे असे सांगण्यात आले असताना सुद्धा हॉटेल मालकांनी सदर हॉटेलचा उपयोग हा व्यवसायिक कारणासाठी करणे सुरू ठेवले होते. या हॉटेल मालकांना या संदर्भात वारोवार नोटीस देऊनही व जिल्हाधिकारी यांनी ताकीद देऊन ही सदर हॉटेल मालकांनी या हॉटेलचा उपयोग व्यावसायिक कारणासाठी सुरू ठेवला होता. यावर कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव व महाबळेश्वर तहसीलदार यांनी संयुक्त कारवाई केली.
अनाधिकृत बांधकाम केल्याबद्दल काही महिन्यापूर्वी रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी आंदोलन केले होते. आंदोलनानंतर प्रशासनाने संबंधित हॉटेल मालकांना अनाधिकृत बांधकामासंबंधी वेळोवेळी नोटीस दिले होते. तरी या हॉटेलच्या मालकाने याकडे दुर्लक्ष करून रहिवाशी कारणासाठी या हॉटेलचा उपयोग न करता व्यवसायासाठी करण्यास सुरुवात केली.
Satata Dist News : हॉटेल बेसिलिकाचे अतिक्रमण जमीनदोस्त, पाचगणी नगरपालिकेची धडक कारवाई…
ही गोष्ट नजरेत येताच प्रशासनाने 24 तासाच्या आत नोटीस देऊन मालकाला हॉटेल सील करण्याचा इशारा दिला होता. याचा इफेक्ट आज लगेच कारवाईच्या रूपाने दिसला. तहसीलदार महाबळेश्वर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी हॉटेल दुपारी सील करण्याची सुरुवात केली. हॉटेलमध्ये असणारे सर्व ग्राहक पर्यटक यांना बाहेर काढण्यात आले व सदर हॉटेल सील करण्यात आल्याने हॉटेलमधील रहिवाशांची गैरसोय झाली.





