Satara ZP Eleciton : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या गोंधळाचे पडसाद विधानसभेत देखील पाहायला मिळाले. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांकडून तुषार दोशी यांना निलंबन करण्याची मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही तुषार दोशी पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल झाले होते. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. Uday Samant : पुणे जिल्ह्यातील उद्योगांसाठी मोठी बातमी! आता मागेल त्याला मिळणार पीएनजी जोडणी..वाचा सविस्तर यानंतर आता सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. Satara ZP Eleciton सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी नेमकं काय घडलं? सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. मात्र, या दरम्यान पोलिसांच्या भूमिकेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. जि.परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे 65 पैकी 35 जागा मिळवत बहुमत होते. यासाठी भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, मात्र साताऱ्यात बहुमतासाठी 33 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती. शंभूराज देसाई भाजपने शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडले आणि एका अपक्षाचाही पाठिंबा मिळवला. यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक भाजपने जिंकली. तर इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा शिवसेनेकडून आरोप करण्यात आला. एकनाथ शिंदेंकडून नाराजी व्यक्त याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. तर शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई कमालीचे आक्रमक झाले होते. त्यांनी या प्रकरणाचे पडसाद थेट विधीमंडळात उमटवले. पोलीस अधीक्षकांनी घरगड्या सारखं काम केलं असून, मंत्र्यांनाच पोलिसांकडून धक्काबुक्की होत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल देसाईंनी केला होता. नीलम गोऱ्हेंनी दिले निलंबनाचे आदेश, पण… तुषार दोशी हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीच्या राड्याप्रकरणी ते चर्चेत आले. यापूर्वी जालना येथील मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमार प्रकरणातही त्यांचे नाव चर्चेत आले होते. Market Yard Scam : मार्केट यार्ड हादरले! २०० कोटींचा ‘फंड स्कॅम’ उघड; दिग्गज व्यापाऱ्यांची झोप उडाली सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीच्या राड्याप्रकरणी विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाचे आदेश दिले होते. मंत्री शंभूराज देसाईंना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी पोलीस यंत्रणेने निष्क्रियता दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. मात्र राम शिंदे यांच्या आदेशानंतर त्यांचे निलंबन रद्द झाले. त्यानंतर ते पुन्हा पोलीस अधीक्षक सातारा कार्यालयात दाखल झाले होते. हेही वाचा: Uday Samant : पुणे जिल्ह्यातील उद्योगांसाठी मोठी बातमी! आता मागेल त्याला मिळणार पीएनजी जोडणी..वाचा सविस्तर