सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत युवती जखमी
Updated On:

सातारा – अज्ञात वाहनाच्या धडकेत एक युवती जखमी झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेंडामाळ नाका, सातारा येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनुजा अनिल दिंडे (वय 20, रा. कृष्णानगर, सातारा) ही युवती जखमी झाली.
तिने याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 7 डिसेंबर रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.





