Satara: महाशिवरात्रीनिमित्त वडूजमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम

वडूज : येथील श्री महादेव मंदिर ट्रस्टच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त रविवार दि. २३ पासून गुरुवार दि. २७ पर्यत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले,असल्याची माहिती श्री महादेव मंदीर ट्रस्टच्यावतीने देण्यात आली.
येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरामध्ये रविवार दि. २३ ते गुरुवार दि. २७ पर्यत दररोज सकाळी सहा वाजता रुद्र अभिषेक करण्यात येईल. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत शिवलिलामृत ग्रंथाचे वाचन होईल. तर दुपारी ४ ते ५ भजन , रात्री ९ वाजता जागर कार्यक्रम पार पडेल.
दरम्यान रविवार दि . २३ फेबुवारी रोजी श्री ज्ञानेश्वरी भजनी मंडळ वडूज ( गोपूजकर ) यांचे भजन तर रात्री ९ वाजता संत तुकाराम भजनी मंडळ , वडूज यांचे जागर , दि. २४ रोजी सदगुरू भजनी मंडळ वडूज यांचे भजन तर माऊली भजनी मंडळ वडूज यांचे जागर , मंगळवार दि .२५ रोजी ब्रह्यचैतन्य भजनी मंडळ वडूज यांचे भजन तर श्री दत्त भजनी मंडळ वडूज यांचे जागरचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दि. २६ रोजी सकाळी ८ वाजता श्री विश्वाराध्याय रुद्र मंडळ , वडूज यांचे रुद्र पठण तर सायंकाळी ७ वाजता महाआरती होईल. रात्री ९ ते १२ .२७ वाजेपर्यंत ह. भ. प. बाल किर्तनकार जनाई महाराज कोकाटे , संगमनगर वैजनाथ परळी यांचे महाशिवरात्री किर्तन होणार आहे.
गुरुवार, दि. २७ रोजी दुपारी साडेबारा ते ९ वाजेपर्यंत शिवप्रसाद रामचंद्र बाबर व परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. पंचक्रोशीतील शिवभक्तांनी धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





