सातारा : दागिन्यांसाठी चोरट्यांकडून पर्यंतीतील मायलेकींचा खून

दोन परप्रांतिय जेरबंद; दुहेरी खुनाचा गुन्हा 72 तासाच्या आत उघड
म्हसवड – माण तालुक्यातील पर्यंती येथे मायलेकींच्या खुनाचा सातारा स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिसांनी घटना घडल्यानंतर 72 तासांच्या आत पर्दाफाश केला असून याप्रकरणी दोन परप्रांतिय चोरट्यांना अटक केली आहे. संदीप शेषमनी पटेल (वय 30), व अजितकुमार रामकिशोर पटेल (वय 29, दोघेही, रा. परसिधी, कोरोल खुर्द, सिधी सिहवाल, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 20 रोजी पर्यंती येथील नंदाबाई भिकू आटपाडकर व संपताबाई लक्ष्मण नरळे यांचा अज्ञाताने गळा आवळून खून केला होता. या दुहेरी खुनाच्या घटनेने माण तालुका हादरला होता. या घटनेची गांभीर्याने नोंद घेत पोलीस अधीक्षकांनी तातडीने तपासाची सुत्रे हलवण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पतंग पाटील व म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते यांच्या अधिपत्याखालील पथके तपास करत होती.
दि. 24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय बातमीदाराकडून परराज्यातील असणारा रहिवासी व सध्या पर्यंती गावात राहणारा जे.सी.बी. चालक व त्याचा साथीदार अशा दोघांनी मिळून सोन्याचे दागिणे व पैशासाठी दोन महिलांचा खून केला असल्याची खबर मिळाली. त्या अनुषंगाने तपास पथकांनी संशयितांचा शोध सुरु केला असता संदीप शेषमनी पटेल, अजितकुमार रामकिशोर पटेल यांना पर्यंती परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांनी सोन्याचे दागिने व पैशांसाठी गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यामुळे मायलेकींच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख ,अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेगाव राजेंद्र शेळके, , पोलीस निरीक्षक, अरुण देवकर, सपोनि शिवाजीराव विभूते, सपोनि सुधीर पाटील, रन्निद भोरे, पोउनि पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, अनिल वाघमोडे, फॉरेन्सिक विभागाच्या सपोनि रुपाली मोरे, स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, लक्ष्मण जगधने, लेलेश फडतरे, अमोल माने, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे,
अमित माने, अविनाश चव्हाण, मोहन पवार, ओंमकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सांवत, पृथ्वीराज जाधव, मयुर देशमुख, स्वप्नील कुंभार, विक्रम पिसाळ, धिरज महाडीक चालक शिवाजी गुरव सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, फॉरेन्सीक विभागाचे राजीव कुंभार, मोहन नाचण तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे रवि डोईफोडे, अमर नारनवर, शामराव वाघमारे, शिवाजी जाधव, अभिजीत बहाद्दले, नवनाथ शिरकुळे, यागेश सुर्यवंशी, धिरज कवडे, जगन्नाथ लुबाळ, भागवत बनसोडे, रुपाली फडतरे, मैना हांगे, यांनी सहभाग घेतला होता.





