Satara : कराड उत्तरमधील रखडलेले व प्रस्तावित सिंचन प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर

नागठाणे : राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मुंबईत मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत कराड उत्तर मतदार संघातील कोट्यवधीचे अनेक रखडलेले व काही प्रस्तावित सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात आल्याची माहिती आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.
यावेळी सचिव संजय बेलसरे, कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, मुख्य अभियंता हणमंत गुनाले, कार्यकारी अभियंता राहुल घनवट, कार्यकारी अभियंता रेड्डीयार उपस्थित होते. बैठकीत घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती देताना आ. मनोज घोरपडे म्हणाले, कराड उत्तरमधील अनेक वर्षे रखडलेली हणबरवाडी, धनगरवाडी उपसा सिंचन योजना आहे.
या योजनेच्या पैकी धनगरवाडी टप्पा क्रमांक एकची सर्व कामे पूर्ण झाली असून सदरची योजना २० मार्च अखेर कार्यान्वित होत आहे. धनगरवाडी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोन बाबत कालबद्ध कार्यक्रम तयार असून टप्पा क्रमांक दोनची स्थापत्य, विद्युत व यांत्रिक अशी कामे या वर्षाच्या डिसेंबर अखेर पूर्ण करून योजना कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सोबतच पाल-इंदोली उपसा सिंचन योजनेस या आठवड्यामध्ये मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
गणेशवाडी उपसा सिचन योजनेचे टेंडर या आठवड्यात निघणार आहे. अतीत समर्थगाव काशीळ उपसा सिंचन योजना लवकर चालू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शामगाव व राजाचे कुर्ले गावास टेंभू योजनेतून पाणी देण्याबाबत चर्चा झाली आहे. नागझरी गावास टेंभू किंवा उरमोडी मधून पाणी आरक्षित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
कृष्णा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बॅरेज पद्धतीत नवीन बांधणे आणि त्या बंधाऱ्यावरील रस्ता 4.25 मीटर रुंदीचा करण्यासाठी व खोडशी धरणापासून चालू होणारा ब्रिटिशकालीन बंधारा सैदापूर ते गोवारे अशी पाच किलोमीटर बंदिस्त पाईपलाईन करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला असून त्याच्याही मंजुरीची कार्यवाही सुरू असल्याचे आ. मनोज घोरपडे यांनी सांगितले.
नदी तीरावरील गावांसाठी पूर संरक्षक भिंती
कृष्णा नदी तिरावरील गावांचे पूरा पासुन संरक्षण व्हावे यासाठी भिंती बांधण्यात येणार असून यामध्ये कराड तालुक्यातील कोर्टी , उंब्रज, वराडे, कोणेगाव, कवठे, खराडे, कालगाव, कोरेगाव तालुक्यातील तारगाव, सातारा तालुक्यातील नांदगाव आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी नांदगाव (ता. सातारा)





