Satara – महाबळेश्वर व फलटण नगरपालिका वगळता सातारा जिल्ह्यातील सात नगरपालिका व एक नगरपंचायत अशा आठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकांच्या निमित्ताने 62 5 उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी इव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणेने या निवडणुकांची पूर्वतयारी केली असून या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला. जिल्ह्यामध्ये 374 मतदान केंद्रांवर 2352 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेचा समन्वय राखण्यासाठी 54 झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत. यंदा सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक राजकीय आणि प्रशासकीय चढ-उतार पाहायला मिळाले. फलटण व महाबळेश्वर येथील अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याचे तांत्रिक कारण झाल्याने राजे निवडणूक आयोगाला त्या निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलाव्या लागल्या. त्यामुळे महाबळेश्वर मधील 68 व फलटणमधील 78 नगरसेवकांचे भवितव्य २० डिसेंबरला निर्धारित होणार आहे. त्यामुळे सातारा, कराड, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड, वाई, मेढा, मलकापूर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 625 उमेदवारांचे राजकीय भवितव्याचा निर्णय मंगळवारी होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वायत्तकार्य क्षेत्रामध्ये निवडणूक प्रक्रिया ही प्रांत अधिकाऱ्यांच्या निगराणी खाली राबवली जाणार आहे. सातारा वर्ग पालिकेची निवडणूक प्रक्रिया शहरातील 156 मतदान केंद्रावरून राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सातारा पालिकेने भारतीय लष्कर व बांबू प्रक्रिया या दोन संकल्पनांवर आधारित आदर्श मतदान केंद्राची निर्मिती केली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 374 मतदान केंद्रे असून त्याकरता तीन लाख 59 हजार मतदार मतदान करणार आहेत. आठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीच्या निमित्ताने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना संपूर्ण तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून यात संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यात आला. सातारा नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी कोडोली एमआयडीसी अन्न वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून एकूण 16 टेबलांवर केली जाणार आहे. साधारण पहिल्या 20 मिनिटात म्हणजे साडेदहापर्यंत पहिला निकाल अपेक्षित आहे. प्रांत आशिष बारकुल यांनी दिवसभर गोडाऊनमध्ये तळ देऊन संपूर्ण प्रशासकीय तयारीची माहिती घेतली व त्याकरिता सातारा पालिकेचे 173 कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. या गोडाऊनच्या भोवती सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.