सातारा – शिक्षक बॅंकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

सातारा – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व भगवती ग्रुप पुणे यांच्या वतीने उभारण्यात येणार्या खाजगी तत्त्वावरील महाराष्ट्रातील पहिला मीडिया टॉवरचे भूमिपूजन डिजिटल स्वरुपात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाराष्ट्रातील पगारदार नोकरांच्या बॅकेत अग्रगण्य असणाऱ्या सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.साताराचे चेअरमन राजेंद्र बोराटे यांचा सन्मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
पुणे येथे जे. डब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्याप्रसंगी दैनिक पुढारीचे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, सकाळचे समूह संपादक सम्राट फडणीस, लोकमतचे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, भगवती ग्रुपचे चेअरमन बाबासाहेब औटी, सातारा जिल्हा शिक्षक संघाचे नेते बलवंत पाटील, सातारा जिल्हा शिक्षक संघाचे युवा नेतृत्व विक्रम डोंगरे,शिक्षक संघटनेचे राजन सावंत, शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र घोरपडे आदी उपस्थित होते.





