सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सहा करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या 1732 झाली आहे. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कोरेगाव येथील 80 वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पिटलमध्ये पुसेगाव ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष, कोळेवाडी ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, रेठरे बुद्रुक ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, तसेच पिंपरी ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष, गोंदवले ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. एकूण नमुने -254476 एकूण बाधित -51774 घरी सोडण्यात आलेले -49334 मृत्यू -1732 उपचारार्थ रुग्ण -708*