Satara: सातारा जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी सेवक पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

सातारा: येथील सातारा जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. या सभेमध्ये सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले.
सभासदांना कर्ज वाटपासाठी निधी कमी पडत असल्याने सभासद वर्गणी दीड हजार रुपये करण्यात आली आहे. मृत सभासदांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या अकस्मात निधीची मर्यादा वाढवून ८० हजार करण्यात आली. सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार आणि संस्थेतर्फे गुणवंत पाल्यांना बक्षीस देवून गौरवण्यात आले. संचालक सुरेश वायदंडे यांच्या वतीने ५ गुणवंत पाल्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
सभेस सातारा जिल्हा बॅकेचे शाखाधिकारी विवेक मोरे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष रामचंद्र संकपाळ, संस्थेचे चेअरमन शशिकांत पाटील, व्हा. चेअरमन आशिष भोसले, संचालक राजेंद्र चांदेकर, सुरेश वायदंडे, संजय जाधव, छाया ढाणे, संदीप क्षीरसागर, सिताराम विटक, विनोद ननावरे,किरण सिंदकर, सौ. शोभा पिसाळ, शरद पवार, विलास शिंदे, विजय खाडे, महेश गुरव, तज्ञ संचालक बाळासाहेब घोलप, सचिव सौ. सुजाता सोनावणे, लिपीक निलेश भोसले, जि. प. कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन किरण पाटणे, व्हा. चेअरमन राकेश जाधव, सुनील कापसे, सागर साळुंखे, प्रशांत भोईटे, तुकाराम खाडे, दिलीप पाटील, संजय ठोके, शशिकांत मोकाशी, सुनील चक्के, अशोक सुतार, जि. प. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या महिला अध्यक्ष राजश्री चिखले, समिना मुजावर, अस्लम मुल्ला, अरूण पवार, संतोष जिमन, देविदास सावळकर, सुनील ढेबे, गेणू कदम, राजेंद्र खामकर, मंदार मोहिते उपस्थित होते.





