Satara : सातारा गटशिक्षणाधिकारी कार्यालय पुणे विभागात अव्वल

सातारा : महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या प्रशासकीय सुधारणा अभियानात विभाग स्तरावरील निवड प्रक्रियेत सातारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाशिकारी कार्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला.
यामध्ये विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी काम करण्यात आले. त्यात सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधील गटशिक्षणाधिकारी कार्यालयांचा सहभाग होता. या अभियानात सातारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने प्रथम क्रमांक मिळवून, विशिष्ट कामगिरी सिद्ध केली आहे.
या शंभर दिवसांच्या अभियानात सातारा पंचायत समितीने आपले संकेतस्थळ विकसित करून, त्यावर शिक्षण विभागाच्या माहितीचे अद्ययावतीकरण केले. ही माहिती सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत.
इयत्ता तिसरी आणि सहावी प्रज्ञाशोध परीक्षा, बीज संकलन स्पर्धा हे नवोपक्रमण कार्यालयीन स्वच्छता, अभिलेख वर्गीकरण, निरुपयोगी साहित्याचे निर्लेखन, ई-ऑफिस कामकाज आणि कामकाजासाठी प्रसन्न वातावरणाच्या दृष्टीने कार्यालयाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटविकास अधिकाारी सतीश बुद्धे यांनी यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे व सहकार्यांचे अभिनंदन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटविकास अधिकारी सतिश बुध्दे यांचे मार्गदर्शन व शिक्षण विभाग, पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, लिपिक, समग्र शिक्षा अभियानातील कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नाने हा गौरव मिळाला आहे. भविष्यातही पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा नावलौकिक अधिक वाढवण्यासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यात येईल.
– रवींद्र खंदारे, गटशिक्षणाधिकारी, सातारा पंचायत समिती.





