सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा उद्या, दि. 16 रोजी सुरू होणार आहेत. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी शाळांना भेटी देणार आहेत. त्याशिवाय जिल्हास्तरीय अधिकारी शंभर शाळांना भेटी देऊन आढावा घेणार आहेत. जिल्ह्यातील 100 शाळांना भेटी देण्याचा उपक्रम शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राबवण्यात येत आहे. मुलांची उपस्थिती व शाळांची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्हाधिकारी ते वर्ग 1 चे अधिकारी भेटी देऊन शाळांचे कामकाज, गुणवत्ता आणि सोयीसुविधांचा आढावा घेणार आहेत. खा. उदयनराजे भोसले हे सातारच्या प्रतापसिंह हायस्कूलला, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे कोंडवे जि. प. प्राथमिक शाळेला, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे शिवथ जि. प. शाळेला, आ. मनोज घोरपडे अतीत जि. प. शाळेला, तर आ. शशिकांत शिंदे हे सोनगाव सं. निंब (ता. सातारा) येथील शाळांना भेटी देणार आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद मायणी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले संगम माहुली, अर्चना वाघमळे करहर, प्रज्ञा माने आलेवाडी, रोहिणी ढवळे भणंग, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम इरिगेशन बंगला, फलटण, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने अंगापूर नं. 1, उपजिल्हाधिकारी नागेश पाटील तारळे (मुली), विक्रांत चव्हाण कोळेवाडी, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने औंध, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात कळंबे, उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे जांब, नूतन पाटील भेकवलीवाडी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड वाशिवली, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आरफळ, धनजंय चोपडे मामुर्डी, अंनिस नायकवडी रेठरे खुर्द, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे आरल (पु.), कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी ल्हासुर्णे, अमर नलवडे शिंदेनगर, गौरव चक्के निनाम, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार निझरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार वरड, कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे पसरणी (ता. वाई) या शाळांना भेटी देणार आहेत. हा उपक्रम आनंददायी होण्यासाठी शाळांना भेटी देणार्या अधिकार्यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्याशी चर्चा करावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कसा वाढेल, यासाठी उपाययोजना सुचवाव्यात. अधिकार्यांनी भौतिक सुविधांचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या खेळांच्या सुविधांचा दर्जा, शाळांमधील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार याबद्दल मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या आहेत.