सातारा – अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
Updated On:

नागठाणे – पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी (ता.सातारा) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक पादचारी ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. २८ रोजी रात्री एकच्या सुमारास कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या लेनवर सत्यम मारूती भोसले (रा. भरतगावाडी ) हे रस्त्याच्या कडेने पायी चालत जात असताना कोल्हापूर बाजुने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
त्या धडकेत भोसले जागीच ठार झाले. बोरगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून उपनिरीक्षक कारळे अधिक तपास करत आहेत.





