सातारा | सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
Updated On:

नागठाणे – नागठाणे ( ता. सातारा) येथे नशेत सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्य शिवीगाळ करत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या गोरख तुकाराम शेळके (रा. नागठाणे) याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील संशयित गोरख शेळके याने दि. २ रोजी नागठाणे सासपडे चौकानजीक असणाऱ्या लाकड़ाच्या वखारीजवळ रस्त्यावरच हा प्रकार केला. याबाबतची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली. त्यांनी शेळके यास ताब्यात घेतले. कॉ. विशाल जाधव यांनी फिर्याद दिली असून सहाय्यक फौजदार प्रविण शिंदे अधिक तपास करत आहेत.





