Satara News : बिअर बार बंद करण्यासाठी विरमाडे ग्रामस्थांचा एल्गार; ग्रामसभेत महिलांची संतप्त भूमिका
वाई तालुक्यातील विरमाडे गावच्या हद्दीतील (Satara News) दोन बिअर बार बंद करण्यासाठीविरमाडे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज झालेल्या ग्रामसभेत गावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ग्रामसभेत बिअर बार बंद करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

Satara News : वाई तालुक्यातील विरमाडे गावच्या हद्दीतील (Satara News) दोन बिअर बार बंद करण्यासाठीविरमाडे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज झालेल्या ग्रामसभेत गावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ग्रामसभेत बिअर बार बंद करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
आनेवाडी टोलनाका परिसरात (Satara News) विरमाडे गावच्यात हद्दीतील ग्रामपंचायतीच्या कोणत्याही परवानगीशिवाय ‘माला बिअर बार अॅन्ड रेस्टो’ तसेच ‘मूनलाईट बिअर बार’ हे दोन बिअर बार सुरु आहेत. हे दोन्ही बार बंद करण्यासाठी विरमाडे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
बार बंद करण्यासाठी बुधवार, दि. 1 जुलै रोजी विरमाडे ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेत तब्बल दोनशे ते अडीचशे महिलांनी सहभाग घेत हे बार बंद करण्यासाठी आक्रमक भूमिका (Satara News) घेतली. यावेळी सर्वानुमते हे दोन्ही बिअर बार बंद करण्याच्या अनुषंगाने ठराव संमत करण्यात आला आहे.






