Satara News : वीर जवान प्रफुल्ल जाधव यांचेवर पुसेगाव (Satara News) येथील येरळा नदीकाठी स्मशानभूमीत शासकीय इतमामात सायंकाळी चार वाजता प्रशासकीय अधिकारी, विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वीर जवान प्रफुल्ल जाधव अमर रहे घोषणा देण्यात आल्या अगदी करुणामय अंतःकरणाने त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला. वीर जवान प्रफुल्ल मानसिंग जाधव यांचे काल 21 रोजी पुणे येथील मिल्ट्री हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले मराठा लाईफ इन्फंट्री इंजिनिअरिंग ग्रुप पुणे येथे त्यांची सतरा वर्ष लष्करी सेवा झालेली असून लष्करी सरावा दरम्यान त्यांचा मागील दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आलेले होते व गेली दोन वर्ष ते लष्करी सेवेत त्या अपघातानंतर देशसेवा करत होते परंतु मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने पुणे येथे त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार चालू होते. या दरम्यान त्यांचा पुणे येथे मृत्यू झाला. Satara News भारतीय लष्करात त्यांनी सतरा वर्ष लष्करी सेवा केली आहे . 2009 रोजी पुणे येथे भारतीय लष्करात ते भरती झाले होते .त्याचे वडील देखील भारतीय लष्कारातुन सेवानिवृत्त झालेले आहेत. कुटुंबाला लष्करी सेवेची परंपरा आहे .आज दि . 22 रोजी रोजी पुणे इथून त्यांची पार्थिव घेऊन भारतीय लष्करातील पुणे येथील एक युनिट पुसेगाव येथे दाखल झाले व त्यानंतर शासकीय इंतमात त्यांच्यावर पुसेगाव येथील येरळा नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे( शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे , तहसीलदार कार्यालय खटाव तालुका याचे वतीने नायब तहसीलदार गायकवाड, सर्कल श्री खटावकर, तलाठी,ग्रामविकास अधिकारी अर्जुन नागरगोजे, सरपंच विशाल जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुळे, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ,विश्वस्त डॉ .सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष जाधव,गौरव जाधव, सचिन देशमुख ,श्री सेवागिरी आजी-माजी सैनिक संघटना यांचे पदाधिकारी तसेच श्री सेवागिरी व्यापार संघटना पुसेगाव शहर यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बाजार समितीचे संचालक गणेश जाधव, संजय चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य , श्री सेवागिरी विद्यालय पुसेगाव ,श्री कला वाणिज्य व महाविद्यालय , श्री हनुमान गिरी हायस्कूल , श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व पुसेगाव – नेर मधील ग्रामस्थ तसेच खटाव तालुक्यातील सर्व माजी सैनिक मोठ्या प्रमाणात अंत्यविधीसाठी हजर होते. दरम्यान पुसेगाव बाजारपेठ दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहीद जवानास भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेली होती .तसेच शहीद जवान प्रफुल्ल मानसिंग जाधव यांची अंत्ययात्रा गोरेवस्ती मार्गे मारुती मंदिर -बाजारपटागण-छत्रपती शिवाजी महाराज चौक -दहिवडी रोड -भवानीनगर -विठ्ठल नगर -जुने पोस्ट ऑफिस मार्गे करंजाळा रोडणे पुसेगाव स्मशान भूमीमध्ये अडीच ते तीन तासाने पोहोचली पोचली व त्यानंतर येरळा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान सर्व ग्रामस्थांनी प्रफुल्ल मानसिंग जाधव अमर रहे अमर रहे अशा घोषणा दिल्या तसेच भारत माता की जय च्या घोषणा या अंतयात्रेदरम्यान देण्यात आल्या .संपूर्ण अंत्ययात्रेच्या मार्गावरती दुतर्फा पुसेगाव येथील हायस्कूल मधील सर्व मुलींनी सुबक रांगोळी काढली होती.