Satara News : ‘कृष्णा’च्या निवडणुकीत मोहिते-भोसले पुन्हा एकत्र; रयतचा ‘सहकार’ला पाठिंबा
रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत (Satara News) पुन्हा एकदा मोहिते-भोसले एकत्र दिसणार आहेत.

Satara News : रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत (Satara News) पुन्हा एकदा मोहिते-भोसले एकत्र दिसणार आहेत. रयत संघर्ष मंचने निवडणुकीतून माघार घेतली असून जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला पाठिंबा दिल्याचे डाॅ. इंद्रजित मोहिते कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले.
सातारा- सांगली जिल्ह्यातील कृष्णा कारखान्याच्या सभासदांचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णा कारखाना निवडणुकीत महत्वाची घडामोड समोर आली आहे. कृष्णा कारखान्यात 2010 मध्ये मोहिते – भोसले एकत्र (Satara News) आले होते. त्यानंतर आता पुन्हा ते एकत्र आले आहेत.
कारखान्याचे विद्यमान चेअरमन डाॅ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेलला रयत संघर्षने पाठिंबा दिल्याने साहजिकच सहकार पॅनलची ताकद वाढणार आहे.
पत्रकार परिषदेला कारखान्याचे संचालक जयवंतराव सावंत, अशोकराव पाटील, जयवंत पाटील, प्रा. अनिल पाटील, मारूती निकम, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष डाॅ. सुधीर जगताप यांच्यासह वाळवा, कडेगाव, विटा तालुक्यातील सभासद उपस्थित होते.
डाॅ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, सहकारी संस्थात राजकारण बाजूला ठेवायचे असते. तसेच सध्या आम्ही निवडणूक लढवू शकत नाही. संस्थापक पॅनेलकडून आम्हांला कसलाच संपर्क करण्यात न आल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. संस्थापक पॅनेलकडे जेव्हा सत्ता होती, तेव्हा कारखाना आर्थिक संकटात सापडला. संस्थापक पॅनेलकडे कोणातही अनुभव असणारा चेहरा नाही. काहीजण पाठिमागून चुकीच्या गोष्टी करत आहेत, त्याला आमचा पाठिंबा नसेल.
केवळ दोनवेळा सहभाग दिसणार!
कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी (Satara News) रयत संघर्षचा पाठिंबा असला तरी मी कोणत्याही सभेत व्यासपीठावर जाणार नाही. केवळ दोनवेळा या निवडणुकीत दिसेन. त्यापैकी आजची पत्रकार परिषद एक झाली. आता एकवेळ येईन. ते कधी सांगता येत नसल्याचे डाॅ. मोहिते यांनी सांगितले. परंतु, आमच्या विचाराची लोक सहकार पॅनेलच्या पाठिशी राहतील.






