Satara News : ‘किसन वीर’ व ‘खंडाळा’ कारखान्यांचे मिल रोलर पूजन संपन्न!
किसन वीर साखर कारखान्याचे 65 हजार सभासद आहेत. प्रत्येक सभासदाने आपला (Satara News) संपूर्ण ऊस गाळपासाठी पाठवल्यास कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास कसलीही अडचण येणार नाही.

Satara News : किसन वीर साखर कारखान्याचे 65 हजार सभासद आहेत. प्रत्येक सभासदाने आपला (Satara News) संपूर्ण ऊस गाळपासाठी पाठवल्यास कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास कसलीही अडचण येणार नाही. गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर कारखान्याचा भविष्यकाळ उज्ज्वलच असेल, असा विश्वास जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केला.
किसन वीर व किसन वीर-खंडाळा या कारखान्यांच्या 2026-27 च्या गळीत हंगामातील मिल रोलर पूजन (Satara News) खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहब सोळसकर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, बावधन सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार पाटील म्हणाले, एनसीडीसी बँकेने दिलेली रक्कम बँकांचे कर्ज भागवण्याकरिताच वापरली आहे. खंडाळा कारखान्याच्या सर्व बँकांचे ओटीएस झाले असून, किसन वीर कारखान्याचे फक्त दोन बँकांचे ओटीएस बाकी आहे. तेही लवकरच होईल. सर्व कर्जे भागवल्यानंतर एक ते दीड वर्षात नेटवर्थ वाढून, बँकांकडून नियमित कर्ज मिळेल.
कारखाना वाचवण्याचे काम मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व आम्ही करत आहोत. आपण चांगल्या प्रतीचा ऊस देणे गरजेचे आहे. दोन्ही कारखान्यांनी मागील हंगामात प्रतिदिन अनुक्रमे पाच हजार ते साडेपाच हजार आणि तीन हजार 400 मेट्रिक टन गाळप केले होते. 2026-27 च्या गळित हंगामामध्ये दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी तोडणी यंत्रणा सज्ज असून, ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी देऊन, किसन वीर कारखान्याचे सात लाख व खंडाळ्याचे चार लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.
व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले, गेल्या चार हंगामांमध्ये सर्व ऊस बिले वर्ग केली आहेत. ना. मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे प्रश्न लवकरच सोडवले जाणार आहेत.
यावेळी संचालक बाबासाहेब कदम, सचिन साळुंखे, हिंदुराव तरडे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, ललित मुळीक, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, सुशीला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, संचालक ज्ञानेश्वर भोसले, पंचायत समितीचे सभापती भैयासाहेब डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे हे उपस्थित होते.
तसेच मार्केट कमिटीचे चेअरमन मोहन जाधव, सदस्य रमेश गायकवाड, पोपट जगताप, शशिकांत पवार, महादेव मस्कर, चरण गायकवाड, प्रा. डॉ. नितीन कदम, अरविंद कुदळे, सत्यजित वीर, पप्पू हगीर, बबनराव साबळे, अजय कदम, अरविंद कदम, अॅड. उदयसिंह पिसाळ, चरण गायकवाड, रामभाऊ शिंदे, कांतिलाल पवार, राजेंद्र सोनावणे, प्रमोद वारागडे, राजेंद्र भोसले, सयाजी बाबर, रफीक फरास, शिवाजीराव बाबर, नारायण नलावडे, सुजीत जाधवराव, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी (Satara News) उपस्थितीत होते.






