संजय पाटील Satara News : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीत असलेल्या एका कंपनीत सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे दहा किलोमीटरचा परिसर हादरला असून एमआयडीसीतील इतर कंपन्यांच्या इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. स्फोटानंतर संबंधित कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्याने, धुराचे लोट लांबूनही स्पष्ट दिसत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली. दरम्यान, ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्फोटामध्ये संबंधित कंपनी पूर्णपणे उध्वस्त झाली असून कंपनीत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशामक दलासह पोलीस प्रशासन मदत कार्यासाठी त्याठिकाणी पोहोचले आहे. आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. हेही वाचा: Summer Health Tips: फ्रिजचं थंड पाणी की माठाचं पाणी? उन्हाळ्यात कोण अधिक फायदेशीर, जाणून घ्या योग्य पर्याय!