Satara News – शहरातील छ. शाहू चौकात लोकशाहीर आण्णा भाऊ साठेंचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. या पुतळ्यात काही त्रुटी राहिल्याने त्या दुरुस्त करुन येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी पुतळा बसवण्याबाबत तयारी सुरु आहे. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा तयार करण्यात आला होता. परंतु, पुतळ्यात अनेक त्रुटी असल्याने समाजातील नेत्यांनी ही बाब प्रकाशझोतात आणली. याची दखल घेत सातारा नगरपालिकेने पुन्हा पुतळ्याची पाहणी करुन या त्रुटी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. गेल्या दोन वर्षांनी आता हा पुतळा पुन्हा दुरुस्त करुन छ. शाहू चौकात बसवण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईत नगराध्यक्षांसह मातंग समाजातील नेत्यांकडून पाहणी करण्यात आली. येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी हा पुतळा बसवण्याबाबत बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. याप्रसंगी सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, मुख्याधिकारी विनोद जळक, उपनगराध्य डी. जी. बनकर, नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे छिद्रे, मांतग समाजाचे नेते सचिन साठे, गणेश भगत, उमेश चव्हाण, गणेश वाघमारे, ऋषिकेश गायकवाड, सचिन पाटोळे, अमोल पाटोळे, सचिन कांबळे, विजय बडेकर, किशोर गालफाडे, संकेत साठे, गणेश भिसे, आकाश चांदणे, बंडू घाडगे, कांतीलाल कांबळे, पप्पू कांबळे, व मान्यवर उपस्थित होते.