Satara News : वीज निर्मिती करणारा कोयना प्रकल्पच अंधारात; तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित
तब्बल 2 हजार मेगावॅट वीज निर्मिती करणारा कोयना प्रकल्प परिसर (Satara News) गेल्या तीन दिवसांपासून अंधारात चाचपडत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. या प्रकल्प परिसरातील वीजपुरवठा खंडित होणे, ही व्यवस्थेतील विसंगती मानली जात आहे.

Satara News : तब्बल 2 हजार मेगावॅट वीज निर्मिती करणारा कोयना प्रकल्प परिसर (Satara News) गेल्या तीन दिवसांपासून अंधारात चाचपडत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. या प्रकल्प परिसरातील वीजपुरवठा खंडित होणे, ही व्यवस्थेतील विसंगती मानली जात आहे.
कोयना धरणाच्या पायथ्याशी 40 मेगावॅट क्षमतेचे वीजगृह असतानाही, प्रकल्प परिसराला तेथून वीजपुरवठा न करता, अलोरे व पोफळी येथून वीज आणली जाते. बाह्य लाईनमध्ये बिघाड झाला की, संपूर्ण कोयना परिसर अंधारात जातो.
सलग तीन दिवस वीजपुरवठा (Satara News) खंडित होत असल्याने, कोयनानगर व आसपासच्या वसाहतींमधील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पाणीपुरवठा, मोबाइल नेटवर्क व दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे वीज वितरणाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा. भविष्यात अशी परिस्थिती (Satara News) निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.






