सातारा : सातारा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट ब्रिजजवळ आज दुपारी एक भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मयत महिलेचे नाव सारिका दीपक सुतार (वय अंदाजे२५ वर्ष) असल्याचे समजत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या दुर्घटनेमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.