satara news: दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध कला शिकून व कला निर्मिती कन त्या लाेकांपर्यंत पोहाचवून स्वावलंबी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले. जिल्हा परिषद सातारा 5 टक्के सेस फंड योजनेंतर्गत मुकबधीर प्रवर्गातील विशेष शाळेतील विद्यार्थ्यांना चित्रकलेचे प्रशिक्षण देणाऱ्या कराड येथील डॉ. द. शि. एरम अपंग सहाय्य संस्थेचे, मूकबधिर विद्यालयास केंद्रास नागराजन यांनी भेट दिली. याप्रसंगी संस्थेच्या विश्वस्त सौ. रोहिणी चिन्मय एरम हजर होत्या. यावेळी नागराजन यांनी चित्र काढत असताना मुलांशी संवाद साधला. मुलांना अनेक विविध स्पर्धा व कलांमध्ये सहभाग घेण्यास प्रवृत्त केले. दिव्यांग मुलांनी अशा विविध कला शिकून व कला निर्मिती करून त्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यातून स्वावलंबी व्हावे. आपल्या शरीरातील कोणतेही दिव्यांगत्व आपणास यशस्वी होण्यापासून थांबवू शकत नाही. जगात सर्वांनाच यशस्वी होण्यासाठी चिकाटी, मेहनत व परिश्रम महत्वाचे असल्याचे नागराजन यांनी स्पष्ट केले. ही कार्यशाळा ३० दिवसांची असून याम्ये क्रिऐटीव पेंटींग, निसर्ग चित्र, वॉल पेंटींग, लिपण आर्ट, वारली पेंटींग अशा विविध विषयावर चित्रांचे रेखाटन व रंगकाम आदी शिकवण्यात येणार आहे. यामध्ये मुलांना सर्व साहित्य व सर्व येणारा खर्च जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत करण्यात येणार आहे. सौ. रोहिणी एरम म्हणाल्या, . प्रशिक्षण केंद्र सुरु होण्यास याशनी नागराजन, समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्रीमती ललिता शेळके यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. प्रशिक्षणार्थींचे पुणे येथे चित्र प्रदर्शन व्हावे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास केंद्र प्रमुख सोनवणे, चित्रकला मार्गदर्शक अर्पिता पवार, विशेष तज्ञ शिक्षक, विद्यालायचे प्राचार्य विजयकुमार घाडगे, प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापक सचिन कुलकर्णी, गुरुकुलचे मुख्याध्यापक संजय हुबाले, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते. कलाविभाग प्रमुख व विद्यालायचे प्राचार्य विजयकुमार घाडगे यांनी या कार्यशाळेचे नियोजन केले.