Satara News : दिवंगत वसंतराव जगदाळे (आबा) यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मसूर येथे शोकसभेचे आयोजन
Updated On:

मसूर : मसूर (ता. कराड) येथील ज्येष्ठ नेते कै. वसंतराव जगदाळे (आबा) यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी येत्या रविवारी, दि. १७ ऑगस्ट रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा मसूर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील बाजार पटांगणात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कै. वसंतराव जगदाळे (आबा) यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. मसूर गावचे सुपुत्र असलेल्या आबांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कराड तालुक्यातील सर्व मान्यवर, पदाधिकारी, हितचिंतक आणि मसूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना या शोकसभेस उपस्थित राहण्याचे आवाहन मसूर ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. सभेत आबांवर प्रेम करणाऱ्या सर्व बंधू-भगिनींनी सहभागी होऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.





