Satara News : अवघ्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराज जयंती (Satara News) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.आजचा दिवस खटावमधील तरूणाईला नवचैतन्य,सळसळता उत्साह व आनंदची परवणीच असते. येथील तरुण देखील आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतात.खटाव (Satara News) येथे छावा ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मागील काही वर्षांपूर्वी तर या तरुण मावळ्यांनी याच दिवशी चक्क दिल्ली येथून ‘शंभूज्योत’ चक्क धावत खटाव येथे आणून इतिहास घडवला होता.या वर्षी किल्ले दातेगड येथून शंभू ज्योत आणण्यात आली.शंभूज्योतीचे गावात आगमन होताच ठिकठिकाणी स्वागत करुन विधिवत पूजन करण्यात आली. तद्नंतर शंभू राजांच्या प्रतिमेच पूजन व भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सायंकाळी शंभू महाराजांच्या पुतळ्याच व ज्योतीचे विधिवत पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. खास आकर्षण म्हणजे सायंकाळी (Satara News) सात वाजता शाही अंबारीतून कृत्रिम हत्तीवरुन भव्य मिरवणुक काढण्यात आली आहे. मिरवणूक येथील छत्रपती शिवाजी चौकात येताच येथील छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन करण्यात आले. खास बाब म्हणजे सदर मिरवणूकीसाठी तासगाव येथील गजलक्ष्मी जिवंत हत्तीची उपस्थिती चर्चेचा व आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती, सोबत घोडे,मर्दानी खेळ म्हणजेच तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपटटा,भाला आदी शस्त्रास्त्रांचे साहशी खेळ.तसेच हालगी,पारंपारिक तुतारी पथक,गजी मंडळ आदी लवाजम्यासह मिरवणुकीत पुढे पुढे सरकत होती. Satara News खास आकर्षणासह फटाक्यांची आतिषबाजी व पांरपारिक वाद्यांच्या गजरात शाही मिरवणुक काढण्यात आली.मिरवणूकीसाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक व ऐतिहासिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. सदर मिरवणुकीचे आयोजन छावा ग्रुप प्रतिष्ठान, खटाव व समस्त ग्रामस्थ यांनी केले होते.येथील छावा ग्रुप नेहमीच छत्रपती संभाजी महाराज जयंती वेगवेगळ्या उपक्रमाने साजरी करीत असतो. या वर्षी देखील छावा ग्रुपच्या युवकांनी महाराजांची जयंती साजरी करून परंपरा जपल्याने परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे.