Satara News : शिरवळ येथे युवकाकडून 15 ग्रॅम मेफॅड्रॉन जप्त
शिरवळ (ता.खंडाळा) याठिकाणी अमली पदार्थ (एमडी) मेफँड्राँन विक्री करण्याकरीता (Satara News) आलेल्या मंदार मंगेश शहाणे (वय २१, रा. बाजारपेठ, शिरवळ ता. खंडाळा) या युवकाचा पाठलाग करीत अंदाजे १५ ग्रँम मुद्देमालासह जेरबंद केले आहे.

Satara News : शिरवळ (ता.खंडाळा) याठिकाणी अमली पदार्थ (एमडी) मेफॅड्रॉन विक्री करण्याकरीता (Satara News) आलेल्या मंदार मंगेश शहाणे (वय २१, रा. बाजारपेठ, शिरवळ ता. खंडाळा) या युवकाचा पाठलाग करीत अंदाजे १५ ग्रँम मुद्देमालासह जेरबंद केले आहे.
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शिरवळ येथील एस. टी. बस स्थानकात (Satara News) एक युवक एमडी (मेफँड्राँन) हे अमली पदार्थ विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना मिळाली.
त्यानुसार याबाबतची माहिती पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक डाँ. वैशाली कडुकर, फलटण पोलीस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे यांना कल्पना देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिद, किर्ती म्हस्के, पोलीस अंमलदार सचिन वीर, नितीन नलावडे, अरविंद बा-हाळे, सूरज चव्हाण,अजित बो-हाटे, भाऊसाहेब दिघे, तुषार अभंग, संजय केंगले, संपत कांबळे, गृहरक्षक दलाचे संतोष इंगवले यांच्या पथकाने एस. टी. बस स्थानकात सापळा रचला.
यावेळी एस. टी. बस स्थानकात शिरवळ येथील मंदार शहाणे हा युवक एम. डी. मेफँड्राँन ड्रग्ज विक्री करण्याकरीता विकत घेणाऱ्याची वाट पाहत असताना शिरवळ पोलीसांची चाहूल लागताच एस. टी. बस स्थानकातून बुलेटवरुन (एमएच 11 सीएन 0766) पलायन करीत असताना शिरवळ पोलिसांच्या पथकाने साधारणपणे एक किलोमीटर पाठलाग करीत शिदेंवाडी गावच्या हद्दीत मंदार शहाणे याच्या मुसक्या आवळत ताब्यात घेतले असता मंदार शहाणे याच्याकडे साधारणपणे 15 ग्रँम एमडी मेफँड्राँन आढळून आले.
यावेळी घटनास्थळी फलटण पोलीस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे, शिरवळ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी व फाँरेन्सिक पथकासहित स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग (एलसीबी)च्या पथकाने भेट देत पाहणी केली. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ (Satara News) उडाली आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत शिरवळ पोलीस स्टेशनला सुरु होती.






