Satara : राष्ट्रवादी काँग्रेसची(शप) उद्या साताऱ्यात बैठक
Updated On:

सातारा, दि. १४ (प्रतिनिधी)- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच जिल्ह्यातील आजी-माजी आमदार- खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 16) सकाळी 10 वाजता येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित केली आहे.
पक्षाचे तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, सर्व कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केले आहे.





