सातारा | खटावजवळ हुसेनपूर येथे पावसात गारठून 40 हून अधिक मेंढरांचा मृत्यू

Updated On:
सातारा | खटावजवळ हुसेनपूर येथे पावसात गारठून 40 हून अधिक मेंढरांचा मृत्यू

खटाव – अचानक हजेरी लावलेल्या पावसात खटाव ता.खटाव येथील हुसेनपूर शिवारात रामचंद्र चव्हाण या मेंढपाळाची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. या शिवारात अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे व हवेतील गारठ्यामुळे तब्बर चाळीस हून अधिक मेंढरे गारठून ठार झाली.

सदर दर्घटनेमुळे इतर मेंढपाळांत देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणी (ता. खटाव) येथील प्रगतिशील शेतकरी श्रीमंत शिंदे यांच्या हुसेनपूर येथील शिवारात खटाव येथील मेंढपाळ रामचंद्र चव्हाण व त्यांचे स्वरूपखानवाडी येथील मावस भाऊ यांनी गेली सहा दिवसापासून मेंढरं बसवली होती.मेंढ्याचे खत शेतासाठी पोशक असल्याने शेतकर-यांचा कला शेतामध्ये मेंढ्या बसविण्याकडे अधिक असतो.

रात्रीच्या वेळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मेंढरं सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी त्यांची लगभय झाली . विज,वारा, पाऊस व किर्रअंधार असल्याने व चिखल झाल्याने व मनुष्यबळाच्या अभावामुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणा पुढे त्यांचे काहीच चालले नाही . येथील मेंढपाळ चव्हाण यांच्या तब्बल चाळीस मेंढ्या गारठून मृत्यूमुखी पडल्या.

सदर घटने बाबत अधिक माहिती घेतली असता असे समजले की लोणी (ता. खटाव) येथील श्रीमंत शिंदे यांच्या हुसेनपूर येथील शेतात चव्हाण व त्यांचा मावस भाऊ यांनी गेली सहा दिवस मेंढरं बसवली होती.एवढ्या मोठ्या पावसाची कसलीच कल्पना नसताना अचानक रात्रीच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मेंढरं सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी त्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. मेंढरे देखील आपला जीव वाचवण्यासाठी सैर भैर इकडे तिकडे धावत होती.

शेत नांगरलेल असल्याने मेंढरं चिखलातच रूतून बसत होती.काही मेंढ्या जीव वाचवण्यासाठी शेजारील ऊसाच्या शेतात घुसल्या व तेथेच मृत्यृमुखी पडल्या.मेंढपाळानी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रभर शर्थीने खिंड लढवली पण तीनशे पैकी चाळीस मेंढ्यानी निसर्गाच्या लहरीपणा पुढे आपले प्राण गमवावे लागले . काही मेंढ्या अत्यावस्थ स्थितीत आहेत. एकदम ४० मेंढरं दगवल्याने चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे.

घटनास्थळी शासनाने प्रतिनिधी डॉ.नितीन खाडे, डॉ.प्रकाश बोराटे, डॉ.विक्रम मोरे ,मंडल अधिकारी एम बी मोहिते, तलाठी बी डी गायकवाड यांनी पंचनामा केला.यावेळी लोणी येथील ज्ञानेश्वर शिंदे, खटाव येथील शिवसेना नेते अमिन आगा, गिरीश शिर्के पत्रकार राजेंद्र शिंदे,किरण देशमुख घटनास्थळी उपस्थित होते.शासन स्तरावरून त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी‌ पीडित चव्हाण परिवाराकडून केली जात आहे.

आणखी संबंधित बातम्या

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

2026-10-08 07:42:29

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

2026-10-03 21:39:17

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

2026-10-03 14:53:47

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

2026-10-01 22:19:44

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

Satara: उत्तम नियोजनामुळे अजिंक्यतारा सूतगिरणीची प्रगती; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

2026-09-30 08:07:55

Satara: उत्तम नियोजनामुळे अजिंक्यतारा सूतगिरणीची प्रगती; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले