सातारा । तामजाई नगर येथे पिवळ्या बेडकांचे मोठ्या प्रमाणावर दर्शन

जून – सातारा येथील तामजाई नगर भागात एका पाणथळ ठिकाणी हे पिवळे बेडूक अचानक मोठ्या संख्येने दिसून आले आहेत. हे पिवळे बेडूक Hoplobatrachus tigerinus म्हणजेच आशियाई बुलफ्रॉग म्हणून ओळखले जातात.

हे बेडूक आकाराने मोठे असून 1 फूट आकारपर्यंत असतात. पावसाच्या सुरवातीला नरांना चटक पिवळा रंग आणि निळ्या रंगाच्या व्होकल सॅक दिसू लागतात. खूपच मोठा आवाज असल्याने 2 ते 3 किलोमीटर परिसरातून हे बेडूक एकत्र येतात. 

हे नर बेडूक आपला चटक पिवळा रंग आणि आवाजाने मादी बेडकांना आकर्षित करतात. नंतर याच लहान तळ्यामध्ये साबुदाण्याच्या आकाराची हजरो अंडी देतात. अशाप्रकारे हे निसर्ग चक्र दरवर्षी सुरू असते.

परंतु मूळ अधिवासात होणारा मानवी हस्तक्षेपा मुळे हे प्राणी नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत. किटकनाशच्या अति वापरामुळे उभयचर प्राणी बेडूक, सिसिलिऑन या प्राण्यांना सगळ्यात मोठा धोका निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.