पुसेसावळी येथे बुधवारी शेळ्या-मेंढ्यांचा बाजार
Updated On:

वडूज – वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने यापुढे पुसेसावळी येथे दर बुधवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरवण्यात येणार असल्याची माहिती सभापती दत्ताजी पवार व उपसभापती विजय शिंदे यांनी दिली.
या बाजाराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 25 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. याबाबत बाजार समितीच्या शेतकरी सभागृहात नुकतीच बैठक झाली. या बैठकीस बाजार समितीचे संचालक आणि पुसेसावळी, मसूर, ओगलेवाडी, कराड, सातारा, रहिमतपूर, तडवळे, मांडवे, शिंगणापूर, वडूज येथील शेळ्या-मेंढ्यांचे व्यापारी उपस्थित होते. या बाजाराचा फायदा परिसरातील 30 ते 35 खेड्यातील पशुपालक शेतकर्यांना होणार आहे. या बाजाराचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सचीव दत्तात्रय नलवडे यांनी केले आहे.





