सातारा – येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या परिसरात युवतींच्या दोन गटांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युवतींमध्ये महाविद्यालयाच्या आवारातच मारामारी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या परिसरात विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच मारामारी होत असते;
परंतु विद्यार्थिनींच्या दोन गटांत मारामारी होण्याचा हा पहिलाचा प्रकार आहे. काही दिवसांपूर्वी कराड बसस्थानकावर युवतींमध्ये झालेल्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.