साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक; शशिकांत शिंदेच्या पराभवानंतर कार्यकर्ते आक्रमक (व्हिडिओ)

Updated On:

सातारा – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. आमदार शशिकांत शिंदेंचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे.

जावळी सोसायटी मतदारसंघातू त्यांचे प्रतिस्पर्धी ज्ञानदेव रांजणे विजयी झाले. बँकेच्या ११ जागा बिनविरोध झाल्या तर दहा जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाली. जावळी प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातील मतांची मोजणी प्रथम झाली. त्यात आमदार शशिकांत शिंदे एका मताने पराभूत झाले. एकूण ४९ मतांपैकी ४८ मते वैध ठरली. एक मत अवैध  होते. शशिकांत शिंदे यांना २४ तर ज्ञानदेव रांजणे यांना २५ मते मिळाली.

दरम्यान, आमदार शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच जोरजोरात घोषणा देण्यात आल्या आहेत. या दगडफेकीमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

2026-10-06 08:43:04

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

Shashikant Shinde: "दोन दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर..." एमपीएससी आंदोलनात शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा

2026-10-06 00:15:19

Shashikant Shinde: "दोन दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर..." एमपीएससी आंदोलनात शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा

Satara DCC Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोडी! ५ ऑक्टोबरला कुणाचा अर्ज बाद होणार? महायुतीचा ठरला 'हा' प्लॅन

2026-10-05 00:30:02

Satara DCC Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोडी! ५ ऑक्टोबरला कुणाचा अर्ज बाद होणार? महायुतीचा ठरला 'हा' प्लॅन

BJP vs NCP: वाईच्या राजकारणात नवा ट्विस्ट! नितीन पाटलांविरुद्ध भाजपच्या बड्या नेत्याचे आव्हान...सहकार क्षेत्रात खळबळ

2026-10-04 00:30:43

BJP vs NCP: वाईच्या राजकारणात नवा ट्विस्ट! नितीन पाटलांविरुद्ध भाजपच्या बड्या नेत्याचे आव्हान...सहकार क्षेत्रात खळबळ

Satara DCC Bank Election: भाजपच्या ‘त्या’ एका मागणीमुळे महायुतीत ठिणगी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेत्यांची डोकेदुखी वाढली

2026-10-04 00:15:56

Satara DCC Bank Election: भाजपच्या ‘त्या’ एका मागणीमुळे महायुतीत ठिणगी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेत्यांची डोकेदुखी वाढली