सातारा । बनपुरीत महिलांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
Updated On:

वडूज – खटाव तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष मधुकर देवकर-पाटील यांचे वडील कै. मोतीराम कृष्णा देवकर यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्ताने बनपुरी, ता. खटाव येथे हळदी- कुंकू आणि गावातील २२५ महिलांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
मधुकर देवकर-पाटील हे दरवर्षी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त काहींना काही उपक्रम राबवत असतात. दुसऱ्या पुण्यतिथीवेळी त्यांनी बनपुरीच्या भारुड भजनाला साऊंड सिस्टीम भेट दिली होती. तिसऱ्या पुण्यतिथीवेळी प्रत्येक मंदिरात तसेच ग्रामपंचायतीला स्टीलच्या खुर्च्या भेट म्हणून दिल्या आहेत.
यावेळी हरणाई सुत गिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, तसेच आजीमाजी कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग तसेच महिला उपस्थित होत्या.





