लोणंद : जुन्या भांडणाच्या कारणावरून जिंती, ता. फलटण येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी लोणंद पोलिसांनी चौघांना अटक केली. या गुन्ह्यातील संशयित आरोपी राकेश ऊर्फ मोन्या रमेश जाधव (वय २९) व आशुतोष ऊर्फ बटया संतोष जाधव (वय २१, दोघे रा. सातसर्कल साखरवाडी, ता. फलटण), प्रविण किसन मोहिते (वय २७) व सिध्दांत यशवंत बनसोडे (वय १९ दोघे, रा. साखरवाडी ता. फलटण) यांना अटक केली तर अजय शशिकांत सपकाळ (रा. साखरवाडी) फरारी आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिंती येथील एका अल्पवयीन मुलाची एप्रिल महिन्यात भांडणे झाली होती. या जुन्या भांडणाचा राग मनात धरून लोणंद येथे आयटीआयमधून घरी चाललेल्या अल्पवयीन मुलाला काळज गावच्या हद्दीत संशयित आरोपी मोन्या निंभोरे, अजय सपकाळ, प्रवीण मोहिते ,विजय सपकाळ, बंड्या जाधव यांनी आपआपसात संगणमत करून दोन पल्सर मोटरसायकल वरून पाठीमागून येऊन जबरदस्तीने त्यास त्याचे मोटरसायकल वर बसवून त्याचे अपहरण केले होते. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी लोणंद पोलिसात फिर्याद दिली होती. या मुलाचा व आरोपीचा शोध घेतला असता मुलाला बारामती तालुक्यात नेऊन लाथा , बुक्क्यांनी मारहाण करून सोडून दिले होते . या गुन्हयातील संशयीत आरोपी फरारी झाले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेची वेगवेगळी पथके तयार केली होती. सपोनि सुशिल भोसले, व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घुले, अंमलदार पोना, बापुराव मदने, विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, यांनी सापळा रचून दोन संशयित आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांचे मदतीने ताब्यात घेतले व दोन आरोपींना आंबवडे ता. कोरेगाव येथून ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उप अधीक्षक बी. वाय. भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशिल भोसले, पीएसआय शिवाजी घुले , ज्योती चव्हाण , सपोफौ. विजय पिसाळ, रापोफौ. दिलीप येळे, पोहवा. संतोष नाळे, पोहवा नितीन भोसले व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पो.ना. बापुराव मदने, विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, सुनिल नामदास, शेखर शिगाडे, चालक जयवंत यादव, जमीर मुलाणी यांनी या कारवाई मध्ये सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घुले करत आहेत.