Satara Corona Virus Updates : मृत व बाधितांची संख्या वाढल्याने चिंता

सातारा – जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये दोन करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर गुरुवारी (दि. 28) रात्री आलेल्या अहवालांनुसार आणखी 90 नागरिक करोनाबाधित झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.
गेल्या काही दिवसांमध्ये पॉझिटिव्ह अहवालांची संख्या 25 ते 50 पर्यंतच्या टप्प्यात होती. ती काल जवळपास दुपटीने वाढली. त्याचबरोबर मृतांची संख्याही वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, करोनावरील लस देशात उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील लसीकरणही सुरू आहे. त्यामुळे नागरिक काहीसे बेफिकीर आहेत; परंतु करोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना, मोर्वे, ता. खंडाळा येथील 80 वर्षीय पुरुष व म्हसवे, ता. जावळी येथील 83 वर्षीय पुरुष, या दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात मंगळवार पेठ, बसाप्पा पेठ प्रत्येकी दोन, शुक्रवार पेठ, मंगळवार तळे प्रत्येकी एक, इतरत्र सहा, तामजाईनगर, लिंब प्रत्येकी दोन, कळंबे, माजगाव, चिंचणेर वंदन, पिलाणी प्रत्येकी एक, कराड तालुक्यामध्ये कराड शहरात सोमवार पेठ, गुरुवार पेठ प्रत्येकी एक, बनुगडेवाडी, मलकापूर, रेठरे बुद्रुक प्रत्येकी एक, फलटण तालुक्यात तरडगाव दोन, फलटण शहर, कोळकी, फरांदवाडी, साठे फाटा (गोखळी), निंबळक, निरगुडी, वडगाव प्रत्येकी एक, वाई तालुक्यात वाई शहर, किकली प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात वडूज, पुसेसावळी, पुसेगाव प्रत्येकी एक, माण तालुक्यात दहिवडी पाच, शेवरी, गोंदवले बुद्रुक प्रत्येकी दोन, मोगराळे, ढाकणी, पळशी प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर 11, पिंपरी सात, साप, सासुर्वे प्रत्येकी तीन, पिंपोडे बुद्रुक, जळगाव, सातारारोड, निगडी, किरोली, धामणेर प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात शिंदेवाडी तीन, शिरवळ एक, जावळी तालुक्यात कुडाळ, भिवडी, बामणोली प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात पाचगणी एक, इतर एक, असे 90 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत करोनाने 1814 बळी घेतले असून बाधितांची एकूण संख्या 56 हजार 289 झाली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर अधिक असला तरी “रिकव्हरी रेट’ 95 टक्क्यांपेक्षा थोडा जास्त आहे, ही बाब दिलासादायक आहे.





