उल्लंघन करणाऱ्यांकडून 31 लाख 71 हजाराचा दंड वसूल
सातारा (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 13 मार्च पासून आज 11 एप्रिल अखेर लॉकडाउन उल्लंघनाच्या एकूण 12253 घटनांची नोंद झाली असून 465 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर प्रतिबंधात्मकतेच्या विविध कारवाईमध्ये मोटारवाहन कायद्यासह एकूण 31 लाख 71 हजार 400 इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
लॉकडाउनचे उल्लंघन केलेल्या विविध कारवाईमध्ये एकूण 81 जणांना अटक करण्यात आली असून आज अखेर 2 हजार 549 वाहने जप्त करण्यात आली आहेत.