भाजलेल्या महिला पोलिसाचे निधन; सातारा पोलिस दलात हळहळ
Updated On:

सातारा – सातारा पोलीस दलाच्या भरोसा सेलमध्ये कार्यरत असलेल्या महिला अंमलदार संगिता जेटाप्पा लोणार (काळेल) (रा.पोलीस वसाहत,सातारा) या दि. 12 रोजी स्वंयपाक घरात गॅसचा भडका झाल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना अधिकच्या उपचारासाठी प्रथम पुणे येथील खासगी रूग्णालयात त्यानंतर ससून सर्वोपचार केंद्र येथे दाखल करण्यात आले होते.
पंचावन्न टक्के भाजलेल्या संगिता यांच्यावर गेले चार दिवस उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या शरीराने उपचाराला साथ न दिल्याने त्यांचा आज मृत्यू झाला. या घटनेमुळे सातारा पोलीस दलासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.





