Satara BJP – भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा संघटनेने पक्षविरोधी काम केल्याच्या आरोपाखाली कराड उत्तर विधानसभा क्षेत्रातील तीन पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली आहे. प्रदेश अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार संबंधितांचे प्राथमिक सदस्यत्व स्थगित करून त्यांची पाच वर्षांसाठी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये किसान विकास मंचचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, तसेच महादेव साळुंखे आणि सचिन नांगरे यांचा समावेश आहे. संबंधित व्यक्ती पदाधिकारी असल्याने त्यांना तात्काळ पदमुक्त करण्यात आल्याचे जिल्हा कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई सातारा जिल्हा कार्यालय येथून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे . याबाबतची माहिती खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा निवडणूक प्रभारी तथा संपर्क मंत्री आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांच्यासह संबंधित पदाधिकार्यांना देण्यात आली आहे. पक्षशिस्त मोडणार्यांवर भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही भाजप जिल्हा संघटनेने दिला आहे.