सातारा : येथील अनंत इंग्लिश स्कूलच्या विदयार्थ्यांनी शासकीय चित्रकला परीक्षेत उत्तुंग यश मिळविले. शासकीय चित्रकला परीक्षा एलिमेंटरी ग्रेड व इंटरमिजिएट ग्रेड या दोन्ही परीक्षांचा निकाल १०० टक्के लागला. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत आशिया मुल्ला, आदर्श बडीगर, अंकिता शिंदे, अर्णव ढोले, आर्यन चव्हाण, ईश्वरी राऊत, जान्हवी जाधव, समर्थ महानवर, श्रावणी क्षीरसागर, श्रेयस होडे, सोहम फरांदे, वेदांत पुरी गोसावी या विद्यार्थ्यांना ए ग्रेड प्राप्त झाली. तर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत आदिती निपाणे, आदिती डिके, आफताब शेख, अजित सपकाळ, अपूर्व गबाणे, अपूर्व पवार, आर्या आंधळकर, अथर्व रावळ, मृणाल यादव, पियुष येवले, पूजा खरात, प्रथमेश गोरे, प्रेरणा शिंदे, रिया काळे, रूद्रा शेवाळे, संदीक्षा भालेराव, शर्वरी बोबडे, श्रेयशी शिंदे, सुरभी कदम, वैभवी मुळे, वेदांत बारसवडे या विद्यार्थ्यांना ए ग्रेड प्राप्त झाली. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत ८१ व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत ८७ विदयार्थ्यांनी यश संपादन कले. या सर्व विदयार्थ्यांना कला शिक्षक सागर सुतार यांचे मार्गदर्शन लाभले. शासकीय चित्रकला परीक्षेत दरवर्षी शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या यशाबददल सातारा एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन डॉ. चेतना माजगावकर, संचालक माजी आमदार प्रभाकर घार्गे, सुनील झंवर, आजीव शिक्षक मंडळाचे चेअरमन सुहास कुलकर्णी, अजित साळुंखे, शालाप्रमुख श्रीमंत गायकवाड, उपशालाप्रमुख सौ. ए. एस. शिंदे, पर्यवेक्षक अनिल खटावकर, ए. एम. शेख, जितेंद्र देवकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.