सातारा – गोडोलीच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध

सातारा – गोडोली, गोळीबार मैदान, विलासपूर, विसावा नाका या भागांत कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली. या भागातील पाणीप्रश्न सोडवला. रस्त्यांची कामे मार्गी लावली. अनेक ठिकाणी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. संपूर्ण भागासह गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, असा शब्द आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
गोडोली येथे नियोजित १ कोटी ६५ लाख निधीचे कै. अभयसिंहराजे भोसले क्रीडा संकुल (कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती आखाड्यासह), म्हस्के कॉलनी व बागडी वस्ती येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, देवी कॉलनीतील खुली जागा विकसित करणे आदी सुमारे २ कोटी ३८ लाख निधीच्या विकासकामांचा भूमिपूजन आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
माजी नगरसेवक शेखर मोरे पाटील, अविनाश कदम, शकील बागवान, मनीषा काळोखे, व्यंकटराव मोरे, आशुतोष चव्हाण, सुनील मोरे पाटील, नारायण साळुंखे, रणजित साळुंखे, फिरोज पठाण, रवी पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शहरातील प्रत्येक भागात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवल्या आहेत. नागरिकांच्या सूचनेनुसार सर्व प्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. रस्ते काँक्रिटीकरण करण्यावर भर दिला असून राज्य सरकारच्या माध्यमातून त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून घेतला आहे. शहराच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या त्रिशंकू भागात विकासकामे मार्गी लावण्यावर भर दिला आहे.
सुनील मोरे पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुधाकर साळुंखे, लक्षण मोरे, राजू मोरे, धृपद मोरे, अमित महिपाल, अशोक जावळीकर, संतोष साळुंखे, पोपटराव मोरे, बाळासाहेब मोरे, शिवाजी मोरे, माधव मोरे, पंडितराव मोरे, अशोक मोरे, उत्तमराव नावडकर, अमोल नलावडे, प्रकाश घुले, श्रीकांत जाधव, नितीराज सूर्यवंशी, प्रमोद मोरे, आनंद मोरे, राजू श्रीरंग मोरे, रामचंद्र मोरे, आप्पा बनकर, चंद्रकांत मोरे, विलास शिंदे, धनंजय शिंदे, सचिन कामटे, देविदास जाधव, संतोष धुमाळ, पूनम निकम, मंगल साळुंखे, प्रकाश घाडगे, योगेश म्हस्के, वामनराव म्हस्के, सागर म्हस्के, बबलू शिंदे, सागर जगताप, कृष्णत मोरे, नवनाथ काकडे, आशिष साळुंखे, केतन जाधव, मोहित खुस्पे, धीरज दिसले, संदीप कुडाळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.





