10 जानेवारीला येतोय ‘या’ कंपनीचा IPO, ग्रे मार्केटमध्ये शानदार प्रतिसाद; गुंतवणूक करावी की नाही?

Sat Kartar Shopping Limited IPO: नवीन वर्षात एकामागोमाग एक अनेक कंपन्यांची रांग लागली आहे. आयपीओंना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळताना दिसतो. लवकरच Sat Kartar Shopping Limited या कंपनीचा आयपीओ येणार आहे.
कंपनीच्या आयपीओची प्राइस बँड 77 ते 81 रुपये प्रति शेअर आहे. तर लॉट साइज 1600 शेअर्स एवढी आहे. ज्यामुळे गुंतवणुकदारांना कमीत कमी 1,29,600 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ग्रे मार्केटमध्ये या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लिस्टिंगवेळी गुंतवणुकदारांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सत करतार शॉपिंग लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकदारांसाठी 10 जानेवारीला खुला होईल. 14 जानेवारीपर्यंत या आयपीओसाठी बोली लावण्याची मुदत आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 33.80 कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यूवर आधारित आहे. ज्यामुळे कंपनी 41.73 लाख नवीन शेअर्स जारी करेल.
अँकर गुंतवणुकदार 9 जानेवारीपासूनच या गुंतवणूक करू शकतात. याद्वारे 9.55 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. 17 जानेवारीला मार्केटमध्ये कंपनीचे लिस्टिंग होईल. ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये शेअर्स 96 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यामुळे लिस्टिंगवेळी गुंतवणुकदारांना नफा होऊ शकतो.
मात्र, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्यायला. बाजारात येणाऱ्या प्रत्येक आयपीओमध्ये गुंतवणूक करणे टाळायला हवे. सत करतार शॉपिंग लिमिटेड कंपनी आयुर्वेदाशी संबंधित आहे. कंपनी लाइफस्टाइल उत्पादनांची देखील निर्मिती करते. कंपनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून विविध आयुर्वेदिक औषधांची विक्री करते.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





