सासवड (प्रतिनिधी) | Saswad Firing – सासवड शहरातील बस स्थानकासमोर गोळीबाराची घटना घडली आहे. बसस्थानकासमोर आईसक्रीम विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राहुल नामदेव टिळेकर (वय ४१) याच्यावर बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. तीन हल्लेखोरांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे. गोळीबार करण्यात आलेला तरुण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारांसाठी त्याला पुणे येथे हलवण्यात आले आहे. गोळीबाराबाबत माहिती मिळताच सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत अधिक तपास सुरु आहे. ( Saswad Firing ) सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…