“सरकार पडू दे, मग तुला मारू” किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

Updated On:

मुंबई – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आली आहे.महापौरांना पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. ‘सरकार पडू दे, मग तुम्हाला वाटेत आणून मारून टाकू’, असे पत्रात लिहिले आहे. याआधीही माजी महापौरांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. असेही पत्रात नमूद करण्यात आले असून यापूर्वी मिळालेली धमकी आम्ही पाठवली होती, असेही लिहिले आहे. या पत्रावर संबंधित व्यक्तीचं नाव, पत्ता देखील नमूद करण्यात आला आहे.

पत्रात व्यक्तीने विजेंद्र म्हात्रे असे नाव लिहिले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. यापूर्वीही अशा धमक्या आल्या असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. पण मी कोणाला घाबरत नाही. अशी त्या म्हणाल्या आहे.

पत्रात लिहिले आहे की,’मी विजेंद्र म्हात्रे.. जय महाराष्ट्र सायबर कॅफे, महाराष्ट्र बँक, उरणमधून बोलतोय. आत्ता लेखी लिहून पाठवतोय. सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवलं होतं. तुला जे करायचं ते कर. उद्धव ठाकरेंना सांग”, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील बंडखोर आमदार आज गोव्याला रवाना होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील ताज रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बंडखोर आमदारांसाठी 70 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यानंतर सर्व आमदार गुरुवारी मुंबईला रवाना होतील. महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर ते थेट विधानसभेत जाणार आहेत.

गुवाहाटीतील हॉटेलमधून बाहेर पडलेल्या शिंदे यांनी गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात महाराष्ट्रातील लोकांच्या शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केले. शिंदे यांनी मंदिराबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आम्ही नवीन सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहोत.’असही ते यावेळी म्हणाले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी; नितीन नवीन यांचा हल्लाबोल

2026-10-08 16:00:09

Rahul Gandhi : राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी; नितीन नवीन यांचा हल्लाबोल

Nana Patekar: “ओल्या लाकडात जाळू नकोस…” ; नानांचे शेवटच्या इच्छेविषयीचे काळीज चिरणारे शब्द

2026-10-08 14:29:47

Nana Patekar: “ओल्या लाकडात जाळू नकोस…” ; नानांचे शेवटच्या इच्छेविषयीचे काळीज चिरणारे शब्द

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

2026-10-08 13:32:59

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं