‘सरहद शौर्याथॉन’ स्पर्धा उत्साहात पडली पार; अनेकांनी घेतला सहभाग

“सरहद शौर्याथॉन २०२४” ही स्पर्धा ३० जून २०२४ रोजी पार पडली. झोजिला वॉर मेमोरियल ते कारगिल वॉर मेमोरियल, द्रास या पहाडातील मार्गावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मुख्य स्पर्धेत ५५ पुरुष आणि ५ महिलांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील पुरुष, महिला आणि मुले, मुली इतर रोड रेसेस (२५,१०,७.५ आणि ४ किमी अंतराच्या) पार पडल्या. बक्षीस समारंभ मेजर जनरल सचिन मलिक (8th Mountain Division) यांचे आणि सरहद पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, अर्हम पुणेचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया यांचे हस्ते झाला.
झोजिला युद्ध विजयाला ७५ वर्षे आणि कारगिल युद्ध विजय दिवसाला २५ वर्षे पूर्ण झाल्या प्रित्यर्थ इंडियन आर्मी, सरहद, अर्हम फाउंडेशन पुणे तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते सुमंत वाईकर यांची
रेस डायरेक्टर आणि वसंत गोखले यांची टेक्निकल डायरेक्टर म्हणून इंडियन आर्मीने नियुक्ती केली होती.
या स्पर्धेतील विजेत्यांना ४ लाख रुपयांचे रोख पारितोषिके देण्यात आली. या प्रसंगी ब्रिगेडियर सुमित अब्रोल, कर्नल अभिषेक चरक, लेफ्ट. कर्नल संदीप दुलहत, लेफ्ट. कर्नल राजेश बांधे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





