Sara Ali Khan : साराला जोडीदार मिळाला? अफेअरच्या चर्चांना उधान, व्हिडीओत दोघेही झाले स्पॅाट, कोण आहे अर्जुन प्रताप बाजवा?

Sara Ali Khan : बॅालिवूडमधील अभिनेत्री सारा अली खान हिची विशेष भूमिका असलेला मेट्रो इन दिनो या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील भूमिकेमुळे सारा चर्चेत आली होती. प्रेक्षकांनी तिच्या भूमिकेचे कौतुक केले होते. सध्या सोशल मीडियावर सारा अली खान हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने तिच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.
नुकतीच साराने दिल्लीतील एका गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी तिच्यासोबत एक तरुण तिच्यासोबत उपस्थित होता. या तरुणाचे नाव अर्जुन प्रताप बाजवा असून दोघांच्या नात्यांची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. पल्लव पलिवाल या पापाराझीच्या इन्स्टाग्राम पेजवर सारा-अर्जुनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अर्जुन प्रताप बाजवा हा कोण आहे याच्याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अर्जुन प्रताप बाजवा हा एक अभिनेता, संगीतकार आहे. याशिवाय तो मार्शल आर्ट्समध्येदेखील निपूण आहे. अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 2015 साली आलेल्या ‘सिंग इज ब्लिंग’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. टबँड ऑफ महाराजाज’च्या माध्यामातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
अर्जुनची बॅालिवडूमध्येही अनेक कलाकारांची ओळख आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवर फॅालोअर्समध्ये बीटाऊनमधील अनेक दिग्गज कलाकार आहेत. मात्र, अर्जुन आणि साराच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या असल्या तरी अद्यापर्यंत दोघांनीही याविषयी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.





