Sara Arjun: बॉलीवूडमध्ये सध्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि सारा अर्जुन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. विशेषतः ‘यालीना’ या भूमिकेमुळे सारा अर्जुनला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली आहे. अलीकडेच सारा अर्जुनने एका मुलाखतीत रणवीर सिंहसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. तिने रणवीरचे मनापासून कौतुक करत म्हटलं की, “रणवीर सिंहसारखा को-स्टार दुसरा कोणीच नाही.” साराच्या मते, रणवीर फक्त स्वतःच्या भूमिकेपुरते मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण चित्रपटाचा विचार करतात. सेटवर ते प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत खूप साधेपणाने वागतात. त्यांनी कधीही आपला सीनियरपणा दाखवून इतरांवर वर्चस्व गाजवलं नाही. त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करताना सगळ्यांना खूप आरामदायी वाटतं. ती पुढे म्हणाली की, रणवीर सिंह यांचं कामाबद्दलचं समर्पण खूप प्रेरणादायी आहे. ते आपल्या प्रत्येक सीनसाठी पूर्ण मेहनत घेतात आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट व्हावी यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या या मेहनतीमुळे आणि ऊर्जा पाहून ती स्वतःही प्रभावित झाल्याचं साराने सांगितलं. (Sara Arjun) Sara Arjun: “त्यांच्यासारख कोणीच नाही”; सारा अर्जुनकडून रणवीर सिंहचे भरभरून कौतुक साराने रणवीरच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना असंही म्हटलं की, “ते फक्त मोठे स्टार नाहीत, तर एक उत्तम माणूसही आहेत.” ते सेटवर स्पॉट बॉयपासून ते मोठ्या कलाकारांपर्यंत सगळ्यांशी समानतेने वागतात. हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. ‘धुरंधर २’ या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने ३५ दिवसांतच तब्बल ११२१ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट मोठा हिट ठरला आहे. याआधीही सारा अर्जुनने सोशल मीडियावर रणवीर सिंहसाठी एक खास पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये तिने त्यांना निडर, ऊर्जावान आणि मेहनती अभिनेता म्हणून संबोधलं होतं. एकूणच, सारा अर्जुनच्या या वक्तव्यामुळे रणवीर सिंहच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू समोर आला आहे. त्यांच्या साधेपणामुळे आणि कामाबद्दलच्या प्रामाणिकतेमुळे ते फक्त प्रेक्षकांचेच नाही, तर सहकलाकारांच्याही मनात खास स्थान मिळवतात. (Sara Arjun)