मुंबई – अभिनेत्री सारा अली खानने कमी कालावधीतच सिनेसृष्टीत स्वत:ची एक नवी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अनेक चाहते आहे. तिचा ‘केदारनाथ’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. अनेकदा ती मंदिरात जाताना पाहायला मिळते. यावरून तिला अनेकदा ट्रोल केले जाते.
नुकतेच सारा अली खान हिमाचलमधील बिजली महादेव या मंदिरात पोहोचली होती. तेव्हा तिला अनेकांनी पुन्हा ट्रोल करण्यास सुरूवात केली होती. तसेच अनेकांनी तिच्या व्हायरल फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करत नाराजी व्यक्त केला होता. मात्र यावेळी तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे.
एका मुलाखतीत सारा म्हणाली, ‘माझ्या कामामुळे कोणाला काही अडचण असेल तर, ती माझी समस्या आहे. कारण मी माझ्या चाहत्यांसाठी अभिनय करते. मात्र माझ्या खासगी आयुष्यामुळे कोणाला त्रास होत असले तर, ते लोकं माझ्याबद्दल काय विचार करतात, याचा मला फरक पडत नाही.’ याआधी सारा केदारनाथ आणि महाकाल मंदिरातही देव दर्शनासाठी गेली होती.
दरम्यान, लवकरच साराचा ‘गॅसलाइट’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा 31 मार्च रोजी Disney+ Hotstar वर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात सारासोबत अभिनेता विक्रांत मैसी आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत दिसत आहे.