तीन किलोमीटर पायी चालत केला हर हर महादेवचा गजर ! सारा अली खानने घेतले तुंगनाथचे दर्शन

मुंबई – चित्रपट अभिनेत्री सारा अली खान उत्तराखंडमध्ये आली होती. तिसरे केदार भगवान तुंगनाथाचे दर्शन घेतले. यावेळी सुमारे पाच तास अभिनेत्रीने मंदिर परिसरात घालववाल्याचे समजते. त्याच ठिकाणी जेवण केल्यानंतर सारा पुन्हा एकदा चोपट्याला परतली.खराब हवामानामुळे सारा चंद्रशिलाला पोहोचू शकली नाही. परंतु वाटेत लागलेल्या बर्फाच्छादित परिसराच्या सौंदर्याचा तिने आनंद घेतला.
तुंगनाथच्या दर्शनासाठी साराने पायी प्रवास देखील केला. चोपटा येथून साडेतीन किमीचे अंतर पायी पार करून ती मंदिरात पोहोचली. तिने तिसर्या केदारचे दर्शन घेतले आणि मनोभावे भगवान शंकराची प्रार्थना केली. त्यानंतर दुपारी सारा तुंगनाथहून चंद्रशिलासाठी निघाली, मात्र खराब हवामान आणि वाटेत बर्फवृष्टीमुळे तिला माघारी परतावे लागले.
खराब हवामानामुळे ती परत तुंगनाथला पोहोचली आणि जवळपास तीन तास थांबली. यादरम्यान तिने अनेक स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. यानंतर दुसऱ्या दिवशी सारा थेट बाबा केदारनाथ यांच्या दर्शनासाठी गेली. यासाठी तिने संपूर्ण एक दिवस घालवल्याचे देखील समजते. यावेळेसचे काही फोटो देखील समोर आले आहेत. अगदी सर्वसामान्यांप्रमाणे यावेळी साराने दर्शन घेतल्याचे समजते.
2018 मध्ये सारा अली खानने अभिषेक कपूर दिग्दर्शित केदारनाथ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटाचे चित्रीकरण केदारघाटी येथील त्रियुगीनारायण आणि केदारनाथ तसेच चोपटा आणि चोपटा-तुंगनाथ येथील छोट्या रस्त्यांवर करण्यात आले होते.





