Sara Ali Khan : सुवर्ण मंदिरात पोहचताच सारा अली खान ढसाढसा रडली; ‘ओव्हरअॅक्टींग’ म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Sara Ali Khan : 'उडता तीर' चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार

Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान आणि आयुष्मान खुराना त्यांच्या आगामी ‘उडता तीर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमृतसरमध्ये होते. यादरम्यान चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दोघांनी सुवर्ण मंदिरात डोकं टेकून आशीर्वाद घेतला.
गोल्डन टेंपलमध्ये आशिर्वाद घेताना सारा अली खानने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. तर आयुष्मान खुरानाने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. मात्र या सगळ्यादरम्यान साराचा एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात सारा गुरुद्वाऱ्यात दर्शन घेताना भावुक झालेली दिसत आहे. ती हुंदके देऊन रडताना दिसत आहे.तिचा हा खूप भावुक झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
View this post on Instagram
व्हिडिओवर नेटिझन्सची प्रतिक्रिया
या व्हिडिओवर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत. कमेंट करता काहींनी सारा अली खानचे अश्रू हे नाटक असल्याचे म्हटले आहे. काही नेटिझन्स लिहित आहेत की सारा अली खानची ओव्हरअॅक्टिंग इथेही थांबलेली नाही. तर काहींनी याला भक्ती आणि श्रद्धेची शक्ती सांगितले आहे. काहींनी गुरुद्वारामध्ये गेल्यानंतर अनेकांसोबत असे होते असे म्हटले आहे. दरम्यान, साराने येथील एक फोटो शेअर करत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. ज्यात तिने, ‘हॅपी दसरा. सर्वांना खूप सारे प्रेम, चांगले भाग्य आणि सुख लाभो,’ असे लिहिले.
‘उडता तीर’ कधी रिलीज होणार?
‘उडता तीर’ चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे आणि त्याआधीच या चित्रपटाच्या टीमने गोल्डन टेम्पलला भेट दिली आहे. सुरुवातीला हा चित्रपट ९ ऑक्टोबरला रिलीज होणार होता, पण नंतर त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट आकाश ए. कौशिक यांचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट आहे.
या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये सारा आणि आयुष्मान व्यतिरिक्त राहुल बोस, राम कपूर, सुहेल नय्यर, गुलशन ग्रोवर, मुकुल देव, रघुबीर यादव, बृजेंद्र काला, संदीप आनंद, सुप्रिया पिळगावकर आणि स्मिता तांबे हे कलाकारही झळकणार आहेत.
हेही वाचा:
Eknath Shinde : “मला कोपऱ्यात कोणी टाकलं?” एकनाथ शिंदे भाषण संपताच भडकले; नेमकं काय घडलं?





