Diljit Dosanjh: दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये सान्या मल्होत्राची धमाकेदार एंट्री! स्टेजवर गायकाने दिले खास सरप्राइज
Diljit Dosanjh दिलजीत दोसांझच्या मुंबई कॉन्सर्टपूर्वी सुरक्षेच्या कारणांमुळे आणि धमक्यांमुळे बरीच चर्चा सुरू होती. मात्र, या सर्वांचा परिणाम कार्यक्रमाच्या उत्साहावर झालेला दिसला नाही. कडक सुरक्षा व्यवस्थेत महालक्ष्मी रेसकोर्स येथे कॉन्सर्ट पार पडला. हजारो चाहत्यांनी दिलजीतच्या गाण्यांवर मनसोक्त ठेका धरला. रात्री उशिरापर्यंत संगीत आणि नृत्याचा आनंद घेत चाहत्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.

Diljit Dosanjh: पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याच्या गाण्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये कायमच पाहायला मिळते. त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीही उत्साहाने सहभागी होत असतात. नुकताच २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे दिलजीतचा शानदार कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टमध्ये हजारो चाहत्यांनी उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही या संगीताच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. अभिनेत्री सान्या मल्होत्रा, करिश्मा कपूर आणि अवनीत कौर यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरली.
धमक्यांनंतरही कॉन्सर्टमध्ये उत्साह
दिलजीत दोसांझच्या मुंबई कॉन्सर्टपूर्वी सुरक्षेच्या कारणांमुळे आणि धमक्यांमुळे बरीच चर्चा सुरू होती. मात्र, या सर्वांचा परिणाम कार्यक्रमाच्या उत्साहावर झालेला दिसला नाही. कडक सुरक्षा व्यवस्थेत महालक्ष्मी रेसकोर्स येथे कॉन्सर्ट पार पडला. हजारो चाहत्यांनी दिलजीतच्या गाण्यांवर मनसोक्त ठेका धरला. रात्री उशिरापर्यंत संगीत आणि नृत्याचा आनंद घेत चाहत्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.
करिश्मा कपूरने गाण्यांवर धरला ठेका
या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरही उपस्थित होती. कॉन्सर्टमधील तिचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. काळ्या रंगाच्या कॅज्युअल आउटफिटमध्ये आणि मोकळ्या केसांमध्ये करिश्मा अतिशय सुंदर दिसत होती. ती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत दिलजीतच्या गाण्यांचा आनंद घेताना दिसली. गाण्यांच्या तालावर थिरकत करिश्माने कॉन्सर्टमध्ये चांगलीच रंगत आणली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
अवनीत कौरच्या डान्सने वेधले लक्ष
अभिनेत्री अवनीत कौरनेही या कॉन्सर्टमध्ये धमाल केली. लाल रंगाच्या कुर्त्यामध्ये अवनीत कार्यक्रमाला पोहोचली होती. कॉन्सर्टदरम्यान ती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत डान्स करताना आणि दिलजीतच्या गाण्यांवर झूमताना दिसली. तिचे मस्ती करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडूनही तिच्या या अंदाजाला पसंती मिळत आहे.

Diljit Dosanjh
सान्या मल्होत्राला स्टेजवर बोलावले
या कॉन्सर्टमधील सर्वात खास क्षण अभिनेत्री सान्या मल्होत्रासाठी ठरला. दिलजीतने सान्याला थेट स्टेजवर बोलावले. यावेळी दिलजीत काळ्या रंगाच्या स्लीव्हलेस टी-शर्टमध्ये दिसला. त्याने सान्यासमोर गुडघ्यावर बसून तिचा हात पकडत गाणे गायले. या खास क्षणामुळे सान्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
स्टेजच्या मागील मोठ्या स्क्रीनवरही हा क्षण दाखवण्यात आला. त्यामुळे उपस्थित चाहत्यांचे लक्ष या खास परफॉर्मन्सकडे वेधले गेले. दिलजीत आणि सान्या यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
धमकीवर दिलजीतचे खास उत्तर
मुंबई कॉन्सर्टला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याच्या चर्चेवर दिलजीतने आपल्या खास अंदाजात प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्याने म्हटले, “दिलजीत को बम से उड़ा देंगे… वाह! शहरों में तो बारूदों का मौसम है, गांव चलो ये अमरूदों का मौसम है.”
दिलजीतच्या या उत्तराचीही चर्चा रंगली. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या कॉन्सर्टमध्ये संगीत, डान्स आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीने चाहत्यांना एक खास अनुभव दिला.





